अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात दोन टप्प्यात कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या एका टप्प्यात अहमदनगर दक्षिण व उत्तरेतील ७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली दरम्यान लागलेल्या निकालामध्ये ७ पैकी ४ बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखले तर २ बाजार समित्यांमध्ये भाजपाला समाधान मानावे लागले होते. दरम्यान ७ पैकी १ जागेवर म्हणजेच कर्जत बाजार समितीमध्ये आघाडीचे रोहित पवार तसेच भाजपाचे राम शिंदे यांच्यात सरळ लढत झाली. यामध्ये मात्र दोघांना समसमान ९ -९ जागा मिळाल्या आहे.
बाजार समितीच्या झालेल्या या निवडणुकीत मात्र भाजपाच्या सुजय विखे विरोधात सर्वत्र एकत्र आल्याने याचा फटका सुजय विखेंना बसला आहे
विशेष करून पारनेर मध्ये आघाडीचे आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी हे दोघेही एकत्र आल्याने पारनेर मध्ये विखेंचा धुव्वा उडाला. त्याचप्रमाणे पारनेर सह राहुरीत देखील आघाडीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना धोबीपछाड देण्यासाठी विखेंची यंत्रणा कामाला लागली होती मात्र तेथे देखील विखेंची जादूची कांडी सपशेल फोल ठरली.
वास्तविक पाहता नगर दक्षिणेतील बाजार समित्यापैकी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुजय विखेंनी आपली ताकद लावली होती. मात्र तेथे आजी माजी आमदार एकत्र आल्याने त्याचा फटका विखेंना बसला, काही महिन्यांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रींगणात आमदार निलेश लंके शड्डू ठोकुन उतरणार असल्याचे बोलले जात आहे त्याचाच परिणाम म्हणजे पारनेर बाजार समिती मध्ये खासदार सुजय विखेंनी आपला पॅनल उभा केला विखेंच्या नेतृत्वात पारनेरची बाजार समिती भाजपाने लढविली मात्र लंके आणि औटी समोर विखेंचे पानिपत झाले. पारनेर बाजार समिती शेतकऱयांसाठी वरदान आहे सहकार क्षेत्रातील तालुक्यातील हि एकमेव संस्था आहे या संस्थेवर जर आपली पकड बसली तर विरोधकांना येणाऱ्या निवडणुकीत याचा मोठा फटका बसेल कदाचित यामुळेच निलेश लंकेना असमान दाखविण्यासाठी विखेंनी आपली यंत्रणा पारनेर तालुक्यात लावली मात्र विखेंच्या नेतृत्वात पारनेर मध्ये भाजपाचा धुव्वा उडाला.
दरम्यान पारनेर मध्ये माझ्या विरोधात सगळे एकत्र झाले त्यामुळे आम्हाला आता पक्ष बळकटीसाठी आणखीन प्रयत्न करता येणार आहे. पारनेरची निवडणूक हि माझ्या मते कधीच प्रतिष्ठेची नव्हती याउलट याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच दिसेल अशी प्रतिक्रिया सुजय विखेंनी दिली त्यामुळे आता बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल अनेक आजी माजी नेत्यांच्या जिव्हारी लागले असून याचे याचे परिणाम नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत दिसेल…!