भाजप निवडणूक प्रचार नियोजन सभेत ठरली प्रचाराचा आराखडा !!
जामखेड : २ एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचार नियोजना संदर्भात आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी राम शिंदे यांनी कार्यकर्यांत नवी ऊर्जा दिली आणि सुजय विखे पाटील यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. यामुळे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विजयाच्या वाटा अधिक सोयीस्कर झाल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीतुन सर्व वाद संपुष्टात आले. याची प्रचिती या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आली. भाजप कार्यकर्त्यांनी सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यापुढे आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या. त्यांना उत्तर देताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी कोणतेही समज गैरसमज उरणार नाही असे आश्वासन दिले.
तर आमदार राम शिंदे यांनी कार्यकऱ्यांशी संवाद साधत सुजय विखे आणि राम शिंदे एकत्र त्यांच्यात कोणतेही मदभेद नसून एकदिलाने आणि सर्व ताकतीने डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी काम करायचे आहे असे सांगत जामखेड मधून सर्वाधिक मते ही सुजय विखे यांना मिळतील असे आश्वासन दिले. तसेच प्रचाराचे नियोजन कसे असणार याबाबत मार्गदर्शन केले. पुन्हा एकदा सुजय दादांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रवीण सानप विधी आघाडी जिल्हा अध्यक्ष, रवी सुरवसे जिल्हा उपाध्यक्ष अहिल्याबाई नगर, सलीम बागवान प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल,शरद कार्ले सभापती मार्केट कमिटी, बिभीषण धनवडे नगरसेवक, डॉ. भगवान मुरूमकर सभापती पंचायत समिती जामखेड, सोमनाथ राळेभात नगराध्यक्ष जामखेड नगरपरिषद, संजीवनी पाटील जिल्हा अध्यक्ष, अजय काशीद तालुका अध्यक्ष, मनीषा मोहलकर महिला जिल्हा सरचिटणीस, बापूराव ढवळे तालुका उपाध्यक्ष यांच्यासह विविध गावांचे सरपंच,भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.