अहमदनगर – अहिल्यानगर नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिध्द कराल असा टोला लावत अहमदनगर जिल्ह्याचे नावं बदलून अहिल्यानगर करण्याच्या मागणीचे पत्रच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
नुकत्याच अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथे पार पडलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती मध्ये पवार आजोबा – नातवाच्या मुघलशाहीने पोलिस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चोंडी येथे दर्शनास जाण्यापासून रोखल.
शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबईत बॉंबस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांना हिंदु राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉंच करण्याचा इवेंट वाटतो.
हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिन्दुस्तानच्या प्रेरणास्थान आहे. जेव्हा हिंदुस्थान मुसलमानीं राजवटीत हिंदुसंस्कृती, मंदिर लुटली आणी तोडली जात होती. त्यावेळेस अहिल्यामातेने यां हिंदु संस्कृतीत प्राण फूकले, त्यांचा जीर्णोद्धार केला.
त्यामुळे ज्या जिल्ह्यात हिंदु राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा जन्म झाला त्या ‘अहमदनगर’ जिल्ह्याचे नावं बदलून अहिल्यानगर करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमीची लोकभावना आहे.
त्यामुळे आता आपण कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुगलशाही कीं होळकरशाही? अहिल्यानगर नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिध्द कराल अन्यथा बहुजन जागा झालाय, आणी संघटित झालाय हे लक्षात ठेवा. असा टोला लावत अहमदनगर जिल्ह्याचे नावं बदलून अहिल्यानगर करण्याच्या मागणीचे पत्रच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.