(अहमदनगर) विशेष मोहिमे दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पाहिजे,फरार व अभिवचन रजेवरील एकुण ३५८ आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यश प्राप्त झाले आहे.सदरील मोहीम ही दि. ९ मे २०२२ पासुन विशेष मोहिम सुरू करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या चार पथकांची नेमणुक करुन पाहिजे,फरार व अभिवचन रजेवरील आरोपी विरुध्द विशेष मोहिम राबवुन जिल्ह्यातील मोक्का आरोपी-१, फरार आरोपी-३, बंदी फरार आरोपी-२ व पाहिजे आरोपी ३५२ असे एकुण ३५८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम मधील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली कारवाई.
*सपोनि/मुंढे यांनी पकडलेले आरोपी-१०४
*पाहिजे असलेल्या आरोपींची संख्या १०२ फरार आरोपी-०२पोसई/
आरोपी-९८ तर मोक्का आरोपी-१
*सपोनि/इंगळे फरार आरोपी-१ पाहिजे आरोपी-९९
*सपोनि/दिवटे पाहिजे आरोपी-६३ एकूण आरोपी
३५२ पकडण्यात टीमला यश आले आहे.
सदरील मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्ह्यातील पाहिजे,फरार व अभिवचन रजेवरील आरोपींचे शोध घेऊन कामगिरी केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील या कर्मचा-यांनी उत्कृष्ट अशी कामगीरी केली .
१) पोहेकॉ/संदीप पवार यांनी ४४ आरोपी शोधून काढले.
२) पोना/लक्ष्मण खोकले यांनी ४४ आरोपी शोधून काढले.
३) पोना/ज्ञानेश्वर शिंदे यांनी २० आरोपी शोधून काढले.
४) पोहेकॉ/विजय वेठेकर यांनी १४ आरोपी शोधून काढले.
५) पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे यांनी १४ आरोपी शोधून काढले.
६) सफौ/भाऊसाहेब काळे यांनी १२ आरोपी शोधून काढले.
७) पोहेकॉ/बबन मखरे यांनी ११ आरोपी शोधून काढले.
८) पोना/सुरेश माळी यांनी १० आरोपी शोधून काढले.
९) पोना/रवि सोनटक्के यांनी १० आरोपी शोधून काढले.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अहमदनगर,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर श्रीरामपूर विभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अंमलदार यांनी केली आहे.