अहमदनगर – अहमदनगर शहरातील आलमगीर तसेच सावेडि उपनगरामध्ये भल्या पहाटे आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला..!
दरम्यान शहरात दिवसभर एक ना अनेक चर्चांना उधाण आलं होतं, जेव्हा हे छापे पडले त्यानंतर आम्ही संबंधित ठिकाणी जाऊन माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनेकांच्या मुखातून वेगवेगळ्या बातम्यां ऐकायला मिळत होत्या. मात्र त्या वेगवेगळ्या बातम्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ते म्हणजे आलमगीर मधला ‘तो व्यापारी’?
विशेष म्हणजे आयकर पथकाने भल्या पहाटे जेव्हा आलमगीर मध्ये छापा टाकला तेव्हा त्यांनी स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली नाही हे विशेष…! भल्या पहाटे त्या पथकातील डजणभर पोलिस अनेकांचे दरवाजे ठोठावत होते आणी विचारत होते ते फ़क्त ‘त्या व्यापाऱ्याचा पत्ता’
दरम्यान आलमगीर नंतर एका उपनगरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरी देखील आयकर पथकाने छापा टाकला होता? आणी दुसरा व्यापारी होता तो म्हणजे आलमगीर मधला. त्याच्या शोधावर हे पथक होते.
दुसरा व्यापारी असलेला तो इसम याचे आलमगीर आणी मुकुंदनगर मध्ये बस्तान असल्याने आयकर विभागाच्या पथकाने मुकुंदनगर आणी आलमगिर मध्येच मध्यरात्री पासुनच बस्तान बांधले होते. लोकांच्या दारी जाऊन तो व्यापारी कूठे राहतो येथे मदरसा कूठे आहे त्याचा घर कूठे आहे अशी चौकशी करत होते? अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
दरम्यान दिवस मावळता मावळता आलमगीरच्या त्या व्यापाऱ्याला संबंधित विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची आयकर विभागाच्या वतीने कसून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे?