Moral Policing : इराणमध्ये हिजाब सक्ती आणि नैतिक पोलिसिंगविरोधातील महिलांच्या लढ्याला यश आले आहे. २२ वर्षीय तरुणी महसा अमिनीच्या मृत्यूनंतर महिलांनी आक्रमकप.. इराण सरकारनं हिजाब सक्ती सुरु जुलैमध्ये सुरुवात केली होती. याचं काटेकोर पालन करण्यासाठी नैतिक पोलिसिंग देखील सुरु करण्यात आलं होतं. देशभर महिलांकडून सुरु असणारा विरोध, हिजाब विरोधी आंदोलन, महसा अमिनी या २२ वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर इराणच्या महिला आक्रमक झाल्या होत्या. इराणच्या अॅथलेटिक्स आणि फुटबॉलच्या टीमच्या विरोधी भूमिकेनंतर इराणच्या सरकारला झुकावं लागलं आहे. हिजाबसक्ती विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांच्या आंदोलनाला यश आलं आहे. इराण सरकारनं नैतिक पोलिसिंग मागं घेण्याचा निर्णय घेतला आहे…इराण सरकारनं नैतिक पोलिसिंगचा निर्णय मागं घेतला आहे. इराणच्या सरकारकडून नैतिक पोलिसिंगद्वारे महिलांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात होता. इराणमध्ये हिजाबसक्ती जुलैमध्ये करण्यात आली होती. याचा विरोध महिलांकडून करण्यात येत होता. महसा अमिनी या २२ वर्षीय युवतीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर महिलांनी आंदोलनाला आक्रमकपणानं सुरु ठेवलं होतं. इराणच्या नैतिक पोलिसिंगच्या विरोधात लढताना २०० जणांचा मृत्यू झाला होता.
इराणच्या महिलांच्या लढ्याला मोठं यश
डोक्याचा स्कार्फ किंवा हिजाब चुकीच्या पद्धतीने घातल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी २२ वर्षीय महसा अमिनी या तरुणीला १३ सप्टेंबरला ताब्यात घेतलं होतं. पुढील तीन दिवसानंतर तिचा मृत्यू झाला होता. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणच्या महिलांनी आक्रमकपणे आंदोलन सुरु केलं होतं. काही महिलांनी या लढ्यात केस देखील कापले होत
हिजाबसक्ती आणि महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या नैतिक पोलिसिंगचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय इराणच्या सरकारनं घेतल्याची माहिती स्थानिक माध्यमांकडून देण्यात आली आहे. अटॉर्नी जनरल मोहम्मद जफर माँचेजेरी यांच्या माहितीनुसार नैतिक पोलिसिंग आणि न्यायव्यवस्थेचा संबंध नसल्यानं ते रद्द करण्यात आलं आहे. त्यांनी एका धार्मिक कार्यक्रमात ही घोषणा केली आहे.