प्रतिनिधी | नगर
गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या दोन टोळ्यांना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातून हद्दपार केले. यात नऊ आरोपींचा समावेश आहे.
श्रीरामपूर शहर ठाण्यात १६ गुन्हे दाखल असलेल्या दाभाडे टोळीला १५ महिन्यांकरीता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये टोळीप्रमुख अर्जुन खुशाल दाभाडे, टोळीसदस्य उद्देश अशोक मंडलिक, सागर विजय धुमाळ, विकी बबन ढमके, विजय
भास्कर हातांगळे ऊर्फ घोगर, नमोद ऊर्फ नम्या अरूण कांबळे, मंगेश साहेबराव साळवे (सर्व रा. गोंधवणी, वार्ड नंबर एक, श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. पप्पू ऊर्फ राहुल बाळासाहेब कदम (वय २८, रा. कदमवस्ती, परिटवाडी, ता. कर्जत) पोलिस व शक्ती ऊर्फ विशाल अशोक अडसुळ (वय २७, रा. राशिन ता. कर्जत) यांना नगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. दहशत निर्माण करणाऱ्या टोळीविरुध्द हद्दपारीची कारवाई करून अधीक्षक पाटील यांनी सराईत गुन्हेगारांना दणका दिला आहे..