पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे
नगर । कलम १४९ अन्वये दिलेल्या नोटीसीला न जुमानता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या 20 जणांविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक तनवीर शेख यांनी फिर्याद दिली आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष जिया शेख, पदाधिकारी हुजेफा शेख, तनवरी सय्यद, आलिम इस्माईल, मौलान रियाज सय्यद (सर्व रा. मुकुंदनगर, नगर) व इतर १५ ते २० कार्यकर्ते यांच्याविरुध्द हा गुन्हा दाखल केला आहे.
. पीएफआय संघटनेच्या पदाधिकाऱ्याची ईडी चौकशी करून त्यांना बदनाम करण्याचे कट कारस्थान आरएसएस आणि भाजप करत असल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष शेख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (३ जून) आंदोलनाचा इशारा दिला होता. तोफखाना पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन करण्यास बंदी घातली होती. दरम्यान आंदोलकांनी शुक्रवारी दुपारी आंदोलन केले. यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.