धुळे शहरातील एलआयसी किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजेंद्र बंब यांच्यासह त्यांच्या भावाच्या घरावर धुळे आर्थिक गुन्हे शाखेसह पाच पथकांनी छापा टाकला. यावेळी अधिकाऱ्यांनी तब्बल सव्वा कोटींची रोकड, ४६ लाखांचे ९९८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अनेक आक्षेपार्ह दस्ताऐजव जप्त करण्यात आली आहे.
धुळे : शहरातील एलआयसी किंग म्हणून चर्चेत असलेल्या राजेंद्र बंब यांच्यासह त्यांच्या भावाच्या घरावर धुळे आर्थिक गुन्हे शाखेसह पाच पथकांनी एकाचवेळी छापा टाकला. काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या चौकशीत पोलिसांना कोटी रुपयांचे घबाड हाती लागले असून महत्त्वाचे दस्तावेज देखील हाती लागले आहेत.LIC किंग राजेंद्र बंब यांच्या घरी आर्थिक गुन्हेचा छापा…
राजेंद्र जीवनलाल बंब याच्याविरोधात काल आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनात अतिशय गुप्तता बाळगत आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस अंमलदारांचे तसेच सावकारांचे सहायक निबंधक तथा उप-निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांचे स्वतंत्र ५ छापा पथके तयार करण्यात आली. आणि राजेंद्र बंब यांच्या राहत्या घरी काल दुपारी धाड टाकण्यात आली.घरातून सव्वा कोटींची रोकड, ४६ लाखांचे ९९८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त…
यावेळी त्यांच्या घरातून तब्बल सव्वा कोटींची रोकड, ४६ लाखांचे ९९८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अनेक आक्षेपार्ह दस्ताऐजव जप्त करण्यात आली आहे. जवळपास ५ पथकाने टाकलेली ही धाड सुमारे ९ ते १० तास सुरू होती. अशी माहिती पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.