येत्या २४ जून रोजी अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ हा चित्रपटप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावर अनेक जण ‘वाय’ अक्षराचे पोस्टर शेअर करताना दिसून येत आहे.
यामध्ये कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा देखील समावेश आहे. नुकतंच भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनीही सोशल मीडियावर ‘वाय’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.
भाजप खासदार सुजय विखे पाटील हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर इंग्रजीतील Y अक्षर लिहिलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी त्यांचा पाठिंबा दर्शवला आहे.त्यामुळे अनेकांना ‘वाय’ नक्की आहे तरी काय याची उत्कंठा लागून राहिली आहे. फक्त सुजय विखे पाटील नव्हे तर सिनेसृष्टीतील कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हा फोटो शेअर करताना दिसत आहे. त्यासोबत त्यांनी माझा पाठिंबा आहे ! आपला? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला सर्वसामान्यांनीही पोस्टर शेअर करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेमका काय आहे सिनेमाची कथा ? जाणून घ्या
सत्य घटनांवर आधारित असलेल्या ‘वाय’ या चित्रपटात मुक्ता बर्वे ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे ही सध्या वाय या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे.