अहमदनगर- पेट्रोल, डिझेलची भरमसाठ दरवाढ झाल्याने तसेच इंधन कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना पेट्रोल, डिझेलचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने इंधन टंचाई जाणवत आहे. त्यामुळेच उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीचे प्रकार शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येत आहे. नगर-सोलापूर रोडवर वाळुंज शिवारात असलेल्या पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या मालट्रकमधून 11 हजार रुपये किंमतीचे 115 लिटर डिझेल चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच नगर-औरंगाबाद महामार्गावर धनगरवाडी शिवारात असलेल्या पेट्रोल पंपावरील दोन मालट्रकमधून सुमारे 37 हजार रुपये किंमतीचे डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत अयान अली हुमायू शेख (रा. पश्चिम बंगाल) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेख हे वाहन चालक असून ते मालट्रक घेऊन नगरमार्गे •पश्चिम बंगालकडे जात असताना शनिवारी (दि.29) रात्री
अहमदनगर- पेट्रोल, डिझेलची भरमसाठ दरवाढ झाल्याने तसेच इंधन कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना पेट्रोल, डिझेलचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने इंधन टंचाई जाणवत आहे. त्यामुळेच उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीचे प्रकार शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येत आहे. नगर-सोलापूर रोडवर वाळुंज शिवारात •असलेल्या पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या मालट्रकमधून 11 हजार रुपये किंमतीचे 115 लिटर डिझेल चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच नगर-औरंगाबाद महामार्गावर धनगरवाडी शिवारात असलेल्या पेट्रोल पंपावरील दोन मालट्रकमधून सुमारे 37 हजार रुपये किंमतीचे डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत अयान अली हुमायू शेख (रा. पश्चिम बंगाल) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेख हे वाहन चालक असून ते मालट्रक घेऊन नगरमार्गे पश्चिम बंगालकडे जात असताना शनिवारी (दि.29) रात्री त्यांनी त्यांचा मालट्रक व त्यांच्या अन्य एका साथीदाराचा मालट्रक अशी दोन वाहने धनगरवाडी शिवारात असलेल्या विठ्ठल हायवे सर्व्हिस या पेट्रोल पंपावर उभे करून आराम करत असताना पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही मालट्रकच्या इंधन टाकीमधून 37 हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरून नेले. या घटनेनंतर फिर्यादी शेख यांनी त्यांच्या वाहन मालकाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर मंगळवारी (दि.31) सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द भा. दं. वि. कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.