अहमदनगर – २८ फेब्रुवारी रोजी अहमदनगर शहरातील दोन गटात वाद होऊन हाणामाऱ्या झाल्या होत्या. झालेल्या मारामारीत बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी यांना मारहाण झाल्याने त्यांना काही दिवस एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी या मारामाऱ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. वास्तविक पोलिसांनी फिर्यादी कुणाल भंडारी यांच्या जबाबानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, स्वतः भंडारी याणी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल झालेला असताना देखील आज अधिवेशनात पोलिसांवरच संशय घेऊन प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने गृहखात्याचा कारभार पाहणाऱ्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यानांच त्यांच्याच पोलिसांवर भरोसा नाय काय हीच म्हण्याची वेळ आता आली आहे.
सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे या अधिवेशनात २८ तारखेला अहमदनगर शहरातील रामवाडी येथे घडलेल्या विवादाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणेंनी प्रश्न उपस्थित केले होते त्यामध्ये त्यांनी आरोपीसह पोलिसानांवर देखील प्रश्न उपस्थित केले, वास्तविक पाहता राज्य सरकारने पोलिसांकडून रामवाडी मारहाण प्रकरणी मागविलेल्या अहवालामध्ये पोलिसांनी दिलेली माहिती हि खोटी ठरविण्याचे काम चक्क सरकारमधील आमदार राणेंनी केल्याने एक ना अनेक प्रश्न पुन्हा नव्याने उपस्थित झाले आहे.
आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मध्ये रामवाडी येथे झालेल्या मारहाणीतील आरोपींवर विनयभंग आणि धार्मिक देवी देवतांच्या प्रतीमेची तोडफोड केल्याचा खळबळ जनक आरोप केला. मात्र त्यांनी स्वतःच लक्षवेधी मांडताना आपल्याला पोलिसांनी दिलेल्या माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचा विनयभंग किंवा देवी देवतांच्या प्रतिमेचे तोडफोड करण्यात आले नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे नितेश राणेंना मिळालेल्या माहितीचीहि चौकशी लावण्याची तत्परता उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी का दाखवली नाही, हा देखील विश्लेषणाचाच भाग आहे नाही का !
त्याला कारण म्हणजे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी राणेंच्या लक्षवेधीला आक्षेप घेत गुन्हेगारांवर कारवाई करा मात्र राणेंनी मांडलेली लक्षवेधी हि सामाजिक तेढ वाढणारी लक्षवेधी असल्याचं सांगत राणेंच्या लक्षवेधीला विरोध केला. एवढेच नाही तर बाळासाहेब थोरातांनी हि लक्षवेधी स्वीकारण्यात का आली असे असेल तर सामाजिक तेढ वाढवून आपल्याला राज्य चालवता येणार नाही असा सल्ला देखील सरकारला दिला. मात्र तरी देखील गृहमंत्री यांनी या प्रकरणाची फेरतपासणी करण्याच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे गृह खात किंवा सरकारला त्यांच्याच पोलिसांवर भरोसा नाय काय हीच म्हण्याची वेळी आता आली असून रात्रंदिवस राब राब राबणाऱ्या पोलिसांना खोट ठरविणाऱ्या राणेंच्या माहितीची देखील चौकशी करण्यात यावी अशी चर्चा देखील त्याच विशिष्ठ समाजातील नागरिका दबक्या आवाजात बोलताहेत. याच उदाहरण जर घेतलं तर अमरावती मध्ये देखील एका खासदाराने लव्ह जिहादच्या नावाखाली चक्क पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना खडेबोल सुनावत राडा घातला होता दरम्यान काही तासातच संबंधित युवतीने मी माझ्या कुटूंबीयांच्या रोजच्या होणाऱ्या त्रासामुळे गेले असून माझी राज्यभर केली गेलेली बदनामी थाबविण्यात यावी असा व्हिडिओच व्हायरल केला होता. त्यामुळे राणेंनी अधिवेशनात पोलिसांवरच लावलेल्या आरोपांची फेरचौकशी होण्याची देखील तितकीच गरज निर्माण झाली आहे अशी चर्चाच अहमदनगर शहराच्या त्या विशिष्ठ समाजाच्या तोडून होत आहे. एवढेच नव्हे तर ज्या रामवाडीचा नाव बदलण्याची तयारी त्या आरोपींची होती असे खुद्द राणे सांगत असतांना दुसरीकडे मात्र त्याच रामवाडीच्या नागरी सुविधांसाठी राणेंनी किंवा त्यांच्या सरकार मधील मंत्र्यानी अधिवशेषणात साधा ‘ब्र’ शब्द देखील काढला नाही, ज्या रामवाडीसाठी आज चक्क अधिवशेषणात घमासान झाली त्या रामवाडीच्या समस्यां सोडविण्यात सरकारने का तत्परता दाखविली नाही हे देखील चर्चा सुरु झाली आहे
वास्तविक पाहता पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून अहमदनगर शहरात उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी खरोखरच प्रयत्न केले आहे. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटने नंतर सण उत्सव साजरे होताना पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी निघणाऱ्या मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे त्यांच्याच वतीने बसविले. कायदा व सुव्यवस्था मोडून काढणाऱ्यावर तडीपारीची कारवाई केली. आयोजित होणाऱ्या सभांना बंदोबस्त देत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची काळजी घेतली. सण उत्सवादरम्यान दोन्ही समाजातील लोकांच्या बैठका घेत समजूत काढली एवढे सगळं पोलिस करत असतांना दुसरीकडे मात्र पोलिसांनीच दिलेल्या अहवालावर त्यांच्याच सरकार मधील आमदार मंत्री व खुद्द गृहमंत्र्यांनाच विश्वास नाही हे नवलच असून गृहखात्याला त्यांच्याच पोलिसानांवर भरोसा नाय काय हीच म्हण म्हण्याची वेळ आता आली आहे एवढेच