अहमदनगर – अहमदनगर मध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी चर्चेत आलेल्या लष्कराच्या बनावट NOC प्रकरणाचा योग्य तपास झाला नसल्याचा दावा तक्रारदार शाकीर शेख यांनी केला असून याबाबत औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होऊन या प्रकरणाबाबत म्हणणे मांडण्याच्या नोटिसा अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे व कोतवाली पोलीस ठाण्याचर पोलीस निरीक्षक यांना न्यायालयाच्या वतीने बजावण्यात आल्या आहेत. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १२ एप्रिल रोजी होणार आहे.
वास्तविक पाहता अहमदनगर शहर व तालुक्यातील लष्कराच्या हद्दीलगतच्या मालमत्ता व प्लाटवर बांधकाम परवानगीसाठी आर्मी हेडक्वार्टरकडून ना-हरकत दाखला दिला जातो. मात्र, उपविभागीय कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या दाखल्यांपैकीकाही दाखले बनावट असल्याचे समोर आले होते. दरम्यान यामध्ये ८ जणांच्या प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करून उपविभागीय कार्यालयाची फसवणूक झाल्याची फिर्याद महसूल सहाय्यक संजय गोलेकर यांनी दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात 28 सप्टेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर या प्रकरणाचा तपास योग्य रितीने होत नसल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती . त्यावर न्यायमूर्ती मंगेश पाटील व अभय वाघवासे यांच्यासमोर सुनावणी होऊन,कोतवाली पोलिस ठाण्यात या संदर्भात दाखल गुन्ह्यात याचिकाकर्ते शेख यांचा जबाब नोंदवून घ्यावा तसेच तपासासाठी त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे रेकॉर्डवर दाखल करून घ्यावीत, असे आदेश न्यायालयाने तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांना दिले होते. त्यानुसार तपासी अधिकारी कातकाडे यांनी शेख यांचा जबाब घेतला व त्यांच्याकडून काही कागदपत्रेही घेतली. पण पुढे सखोल तपास न करता थेट न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आतर ! त्यामुळे आता शेख यांनी आणखी एक याचिका दाखल केली असून, संबंधित प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने याबनावट एनओसी प्रकरणाचा तपास एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) यांच्याकडे देण्याची मागणी केली आहे. या याचिकेची नुकतीच 14 मार्चला न्यायमूर्ती मंगेशपाटील व एम. एम. साठ्ये यांच्यासमोर सुनावणी झाली.
दरम्यान या याचिकेच्या सुनावणीत तपासात झालेल्या त्रुटी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. या प्रकरणी केवळ तीन गुन्हे दाखल आहेत. शेख यांच्या जबाबानंतर पोलिसांनी या तपासाची व्याप्ती वाढवून या प्रकरणाशी संबंंधित आणखी कोण-कोण आहेत, यांचा शोध घेणे गरजेचे होते. तसेच अन्य काही फसवणुकीची प्रकरणे घडली आहेत का, याचाही शोध घेऊन त्यासंदर्भातही गुन्हे दाखल करणे आवश्यक होते. पण पोलिसांनी फक्त तीन दाखलगुन्ह्यांपुरता तपास सीमित ठेवून या प्रकरणांचे दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल केलेअसल्याने या प्रकरणातील अन्य गुन्हेगारांना अभय दिल्यासारखे झाले आहे, असा दावा शेख यांच्यावतीने अॅड. तळेकर व अॅड. काळे यांनी केला. यावर न्यायालयाने दखल घेऊन तपासातील त्रुटी व अन्य मुद्यांच्या अनुषंगाने म्हणणे मांडण्याच्या नोटीसा नगर जिल्हा पोलिस अधीक्षक, तपासी अधिकारी उपविभागीयपोलिस अधिकारी अनिल कातकडे व कोतवाली पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक यांना बजावण्याचेआदेश दिले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे.
बनावट एनओसी प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यातआल्यावर लष्करी आस्थापना व महसूल विभागाने यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याकडे केली होती. पण या पोलिस ठाण्याचेप्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. देशमुख यांनी चौकशी सुरू असल्याचे कारण सांगून पाच महिने त्यावर काहीच कार्यवाही केली नसल्याने सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची त्यांनी तातडीने दखल घेऊन पोलिस अधीक्षकांकडून यासंदर्भातील सविस्तर अहवाल मागवला तसेच भिंगार कॅम्प पोलिसठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. देशमुख यांची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांना दिले आहेत व त्यांनी याचौकशी अंतर्गत तक्रारदार शेख यांचा जबाब नुकताच नोंदवला आहे.