अहमदनगर प्रतिनिधी:-जिल्हयात श्रीरामपुर मध्ये तब्बल ८ गावठी कट्टे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून पकडले.८ गावठी कटयांबरोबर १० जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.येत्या दोन-तीन महिन्या नगरपालिकेची निवडणुक होणार आहे.निवडणुकीच्या तोंडावर तब्बल ८ गावठी कट्टे सापडल्याने शहरातील नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रस्तुत बातमीतील माहिती अशी की,श्रीरामपुरात काही जणांकडे गावठी कट्टे आल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांना मिळाली.सदर माहितीची खात्री करत जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व पोनि.अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक श्रीरामपूर मध्ये गेले असता पथकात सपोनि/सोमनाथ दिवटे यांच्यासह सफौ/राजेंद्र वाघ,संजय खंडागळे, बापू फौलाणे, देवेंद्र शेलार,भिमराज खरसे, पोना/शंकर चौधरी,सुरेश माळी,रवी सोनटक्के,मयुर गायकवाड,सागर ससाने, चंद्रकांत कुसळकर,आदींचे पथक श्रीरामपुरात आले असताना शहरातील एसटी स्टॅन्ड जवळ असणाऱ्या हॉटेल राधिकाच्या पार्कींगच्या परिसरात आरोपी असल्याची पक्की माहिती समजल्यानंतर याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला असता त्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आल्यानंतर हेच ते आरोपी असल्याची खात्री पटल्यानंतर झडप घालून तिघा जणांना पोलिसांनी पकडले.त्यांच्याकडे झडती घेतली असता ८ गावठी कट्टे सापडून आले आणि त्याचबरोबर १० जिवंत काडतुसही मिळाले.या आरोपींना तातडीने पोलिसांनी गावठी कट्टयांसह ताब्यात घेतले.सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री. संदीप मिटके उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. याबाबत सफौ/ राजेंद्र वाघ नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून आर्म अॅक्ट कलम ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.