जिल्ह्यात इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या संघटनेच्यावतीने शहर उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन. शहरात इंटरनेट पुरविणारे बॉक्स व केबलची शहरातून चोरी होत असल्याने कारवाई करण्याची मागणी. अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरांमध्ये इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी विविध कंपनी कडून शहरात बसवण्यात आलेल्या प्रायमरी फ्लॅट बॉक्स व फायबर केबल शहरातून बऱ्याच ठिकाणाहून चोरी झाल्याची घटना समोर आलीय काही इंटरनेट सेवा बंद झाल्यानंतर केलेल्या तपासणीत हा प्रकार समोर आला असुन. याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशन येथे सोफियान हुसैन कुरेशी यांनी गुन्हा दाखल केला.असून विविध कंपनीचे इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी बसवण्यात आलेले प्रायमरी फॅट बॉक्सचेक केले असता. ते बॉक्स व फायबर केबल चे बंडल तेथे नव्हते त्यामुळे चोरी झाल्याचे दिसून आले. शहरातील डावरे गल्ली, बांबू गल्ली, नवी पेठ आदींसह जिल्ह्यातून अनेक ठिकाणी हे इंटरनेट पुरवणारे बॉक्स व केबल चोरीला जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू असून या प्रकरणात इंटरनेट पुरवणाऱ्या संघटनेला मोठा नुकसान झेलावा लागत असल्याने लवकरात लवकर योग्य तपास करून आरोपींना कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांना निवेदन देताना संघटनेचे सोफियान कुरेशी, अजय दंडवते, सतीश नेवासकर, सचिन शिरसाट, सुरज भोसले, गौरव शिंदे, हेमांशू पाटील, शुभम शिंदे, सनी आगरकर, तुषार यादव, मुतहिन शेख आदी उपस्थित होते.