Ahmednagar |
दि. ०६/०३/२०२३ रोजी कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम हा त्याचे कंबरेला काहीतरी शस्त्र लावुन मार्केटयार्ड मध्ये सार्वजनिक शौचालय जवळ मागील बाजुस गांजा पिण्याकरिता बसलेला आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध • पथकास सदर ठिकाणी जावुन स्वताची सुरक्षितता बाळगुन खात्री करुन काही आक्षेपार्ह मिळुन आल्यास त्याचेवर कारवाई करा असा आदेश पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिल्याने गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जावुन मार्केटयार्डमधील सार्वजनिक शौचालयच्या जवळ मागील बाजुस पाहणी केली असता तेथे एक इसम चिलीम व गांजाच्या सहाय्याने तोंडाने धुर काढतांना दिसुन आला त्यास जागीच पकडुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत कंबरेला खोसलेला एक १५२००/- रु कि चा १ लोखंडी पिस्टल मॅगजिन गावठी बनावटीचा कटटा व दोन जिवंत काडतुसे असे आरोपी नामे जॉन कासिनो परेरा वय-३४ वर्षे रा. चंदे बेकरीजवळ, बंगालचौकी अहमदनगर याच्या कबज्यात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे व त्याचे विरोधात कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोका कैलास शिरसाठ यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि क्रं. २२१ / २०२३ आर्म अॅक्ट ३/२५ सह एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास हा पोहेकाँ गणेश धोत्रे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सोो, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकाडे सोो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव सो, पोसई मनोज कचरे, पोहेकॉ / गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना रियाज इनामदार, पोना योगेश खामकर, पोकों/सुजय हिवाळे, पोकॉ/संदिप थोरात, पोकॉ/ कैलास शिरसाठ, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकॉ/ अमोल गाढे, पोकों/सागर मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.
