भाग 2….
RTO कार्यालयात वादग्रस्त ठरत असलेल्या ‘त्या’ मँडमवर कारवाई करण्याची धमक वरिष्ठ दाखवणार का!; गुरुवारी झालेली बैठक मँडमला वाचविण्यासाठी तर नाही ना? वाचा मँडमच्या कारनम्याचा पंचनामा!
अहमदनगर – अहमदनगर शहरातील उपप्रादेशिक कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणाऱ्या त्या मँडमवर वरिष्ठ मेहेरबान असल्याचे बोलले जात आहे!. इतकेच नाही तर त्या मँडमच्या बचावासाठी गुरुवारी संध्याकाळी कार्यालयात वरिष्ठांची एक बैठक देखील पार पाडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे?
म्हणूनच वरिष्ठांच्या सबका साथ सबका विकासाच्या भूमिकेमुळे त्या संबंधित मँडम मनमर्जीने दादागिरी आणी गुंडगिरी करून शासकीय कार्यालयासह सर्वसामान्यांना वेठीस धरत आहे. मात्र मँडमने केलेले कारनामे एक नाही तर अनेक असतांना सुध्दा वरिष्ठ साधी कारवाई करण्याचे देखील धाडस दाखवत नसतील तर जनतेने अश्या अधिकाऱ्यांवर काय विश्वास ठेवायचा हाच प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी उपप्रादेशिक कार्यालयात याचं संबधित मँडमची ड्यूटी असतांना देखील त्यांनी दादागिरी करत स्वःतच्या नावाने असलेल्या ड्यूटीवर दुसऱ्यालाच उभे केलें होते. त्यानंतर तेथे घडलेल्या अपघाताच्या घटना सर्वश्रुत असतांना देखील वरिष्ठांनीं साधी चौकशी करण्याची धमक दाखवली नाही.
तर उपप्रादेशिक कार्यालयात सर्वसामान्यांना लूटणाऱ्या अनं डोकेदुखी ठरणाऱ्या अनाधिकृत दलालासोबत कार्यालयाच्याच पासिंग प्रशिक्षण ट्रकवर विशिष्ट कामांकरीता फिरण्याची मजल या मँडम मारली होती! आता अनाधिकृत दलालांसोबत कार्यालयाच्या आवारात कोणता विशिष्ठ काम असेल. याचं विश्लेषणपण आम्ही नक्किच करू? पण यावर साधी विचारणा देखील केली गेली नाही
एवढेच नव्हे तर गाड्यां पासिंग करण्याकरीता गाडी फिट आहे कीं नाही हे तपासले जाते आणी त्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. परंतु या कार्यालयात गाडी अनंफिट जरी असली तरी एका विशिष्ठ स्टार द्वारे तेथील दलाल ग्राहकांना पैश्यांची मागणी करतात! याचं स्टारचे सत्य NEWS ALERT ने दाखविण्याचा प्रयत्न केला अनं स्टारच्या माध्यमातून दलालाकड़े जमा होणाऱ्या पैश्यांची पोलखोल झाली? पोलखोल होताच दीन क़े उजाले में शाम क़े स्टार ने विनंती अर्जाद्वारे स्वःतची बदली करून घेतली, दरम्यान ते साहेब गेले मात्र उपप्रादेशिक कार्यालयाचा स्टार काही थांबता थांबेना? कार्यालयाच्या प्रशिक्षण ट्रकवर हा स्टार सुसाट पळताना दिसत आहे. परंतु दुसरीकडे रिमोट कंट्रोल द्वारे दलालांमार्फत या स्टारला पळवीणाऱ्याची देखील आता पोलखोल झाली आहे?
शहरातील एका शासकीय कार्यालयातील गाडय़ा री-पासिंग करण्याकरीता उपप्रादेशिक कार्यालयात आणण्यात आल्या होत्या. परंतु कागदावर स्टार नसल्यामुळे या मँडम दलालावर जाम भडकल्या! दलालाने हकीकत सांगितली तरी मँडमने आडमुठेपणाची भूमिका घेतली! आणी त्या गाडय़ाची री-पासिंग लांबणीवर पडली. अनं मँडमच्या गुंडगिरी आणी स्टारची चर्चा आख्या शहरात झाली!
दरम्यान मँडमच्या कारनाम्याचा पंचनामा प्रसिद्ध झाला असतांना देखील वरिष्ठ या मँडमवर कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही. एवढेच नाही तर उलट गुरुवारी संध्याकाळी याचं मँडमच्या बचावासाठी चक्क वरिष्ठांनीं बैठका घेतल्याची माहीती देखील समोर आली आहे? मँडमला पाठीशी घालण्यासाठी झालेली बैठक खरी असेल तर त्याचा देखील पंचनामा होईलच!
परंतु वारंवार वादग्रस्त ठरणाऱ्या त्या मँडमवर वरिष्ठ इतके महेरबान का हाच प्रश्न नागरीक उपस्थित करत आहे त्यामुळे आता तरी वरिष्ठांनीं स्वःतची धमक दाखवून कार्यालयाची आबरू वेशीवर टांगनाऱ्या त्या मँडमवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे