मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई भारतीय युवा मोर्चाच्या तक्रारीनंतर मुंबई वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात सुरू असलेल्या बेकायदेशीर सिटीस्कॅन प्रकरणात मुंबई महानगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून रुग्णालयात असलेले सिटीस्कॅन मशिन सेवा तात्काळ हलवण्याचे आदेश दिले आहेत .

या कारवाईचे नवी मुंबई भाजपा युवा मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आहे , मात्र संबंधित ठेकेदारावर गुन्हे कधी दाखल करणार असा प्रश्नही नवी मुंबई भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश देशमुख यांनी केला आहे.
नवी मुंबई भारतीय युवा मोर्चाच्या वतीने मुंबई महानगरपालिकेला पाठवण्यात आलेल्या पत्रात काही प्रश्न उपस्थित केले आहे.त्यामध्ये प्रामुख्याने कार्यादेश, करारनामा नसताना काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार का ? पैसे घेऊन सर्वसामान्य गरजू रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार का ? संबंधित ठेकेदारावर PCPNDT अधिनियम नुसार कारवाई करणार का ? असे प्रश्न नवी मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गणेश देशमुख यांनी उपस्थित केले आहेत .

